Latest Posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जल्लोषपुर्ण व उत्साहाच्या वातावरणात पार पडली गडचिरोली महा मॅरेथॉन २०२४ 

– १३ हजारहुन अधिक युवक युवती व नागरिकांचा सहभाग
– २१ कि.मी. मध्ये पुरुष गटात चामोर्शीच्या नागेश्वरने तर महिला गटात लाहेरीच्या प्रियंकाने मारली बाजी
– प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली महोत्सवाची सांगता
– २० चारचाकी व ५४ दुचाकी वाहनांचे संपन्न झाला लोकार्पण सोहळा
– ३६४ नवीन पोलीस अधिकारी अंमलदार यांचे निवासस्थानाचे भुमीपुजन समारंभ
– मान्यवरांच्या उपस्थितीत पोस्टे वांगेतुरी येथे महा जनजागरण मेळाव्याचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने एक धाव आदिवासी विकासासाठी या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आज ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद मैदानावर भव्य महा मॅरेथॉन २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर महा मॅरेथॅानमध्ये अतिशय जल्लोषपूर्ण व उत्साहाच्या वातावरणात गडचिरोली जिल्ह्रातील १३ हजारहुन अधिक युवक युवती व नागरिकांनी सहभाग नोंदवुन ही महा मॅरेथॉन पुर्ण केली. या गडचिरोली महा मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म.रा. यांच्या हस्ते तसेच धर्मरावबाबा आत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री म.रा., अशोक नेते खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र, देवराव होळी विधानसभा सदस्य गडचिरोली, कृष्णा गजबे विधानसभा सदस्य आरमोरी, विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान नागपूर संदिप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली आयुशी सिंह, न्यायाधिश आर.आर. पाटील, वनसंरक्षक गडचिरोली किशोर मानकर, आर.एस. बाळापूरकर कमान्डट ९ बटा. केरिपूबल, एम.एच. खोब्रागडे कमान्डट ३७ बटा. केरिपूबल व उप-वनसंरक्षक आल्लापल्ली राहुल एस. तोलीया इ. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

यासोबतच ०३ फेब्रवारी २०२४ रोजी सायं ०६.०० ते १०.०० वाजता दरम्यान गडचिरोली महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन गडचिरोली महोत्सवाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मान्यावरांनी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आस्वाद घेतला. यावेळी महोत्सवात अयोजित जिल्हास्तरीय कबड्डी, व्हॉलीबॉल व रेला नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच सदर महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलच्या माध्यमातुन जवळपास २५ ते ३० लाख रुपयाची आर्थिक उलाढाल झाली. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रसिध्द कलाकार सहभागी झाले त्यामध्ये गौरव मोरे, शिवाली परब, रवींद्र खोमणे, संज्योती जगदाळे, प्रथमेश माने, अपेक्षा लोंढे, आर.जे. आरव व आर.जे. भावना सह गडचिरोली मधील स्थानिक कलाकारांनी सुध्दा सहभाग घेवुन उत्तम कलांचे सादरीकरण केलेे.

जिल्ह्रातील दुर्गम अतिदुर्गम भागातील युवक युवतींच्या कलागुणांना वाव मिळावा व विविध क्षेत्रात त्यांनी स्वत:चे नाव उंचवावे या उदात्त हेतूने गडचिरोली पोलीस दलाने वेगवेगळ्या स्पर्धा व मेळाव्यांच्या माध्यमातून नेहमीच पाठबळ दिले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमागचा उद्देश देखील हाच होता की, जिल्ह्रातील युवक युवतींनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन एक चांगली कामगिरी करावी. आज झालेल्या स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत व्हावा याकरीता देवेंद्र फडणवीस सोबत ईतर मान्यवरांनी या महामॅरेथॉन मध्ये प्रत्यक्ष भाग घेवुन मॅरेथॉन पुर्ण केली आहे. ही महा मॅरेथॉन स्पर्धा ३ कि.मी., ५ कि.मी., १० कि.मी. व २१ कि.मी. अशा वेगवेगळ्या चार प्रकारात घेण्यात आली व प्रत्येक प्रकारात पुरुष गट, महिला गट असे गटनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आलेे. ३ कि.मी. स्पर्धेत पुरुष गटात प्रथम- यश भांडेकर गडचिरोली, द्वितीय- गणेश नैताम कुरखेडा व तृतीय- कपील कुमरे कुरखेडा तसेच महिला गटात प्रथम- अर्चना मट्टामी भामरागड, द्वितीय- रंजु दुर्वा व तृतीय- ज्योती कोवासे यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार व ५ हजार रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र, ५ कि.मी. स्पर्धेत पुरुष गटात प्रथम- सुरज बोटरे घोट, द्वितीय- अक्षय पारधी कुरखेडा व तृतीय- केतन कुमरे कुरखेडा तसेच महिला गटात प्रथम- निकीता मडावी अहेरी, द्वितीय- अंकिता मडावी अहेरी व तृतीय- स्नेहल रोडे गडचिरोली यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, ११ हजार व ८ हजार रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र, १० कि.मी. स्पर्धेत पुरुष गटात प्रथम- संपतराव ईष्टाम पेरमीली, द्वितीय- विक्की चलाख घोट व तृतीय- अक्षय देवतळे चामोर्शी तसेच महिला गटात प्रथम- दिक्षा तिजारे आरमोरी, द्वितीय- दिक्षा चौके आरमोरी व तृतीय- अमीशा घाटूरकर आरमोरी यांनी क्रमांक पटकवला असुन विजेत्यांना अनुक्रमे १ हजार, १५ हजार व ११ हजार रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र व २१ कि.मी. स्पर्धेत पुरष गटात प्रथम- नागेश्वर रस्से चामोर्शी, द्वितीय- प्रकाश मिरी कुरखेडा व तृतीय- रोशन बोधलकर चामोर्शी तसेच महिला गटात प्रथम- प्रियंका ओक्सा लाहेरी, द्वितीय- मनीषा वड्डे भामरागड व तृतीय- रोहीनी जुवारे आरमोरी यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार व २१ हजार रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिकांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरीत करण्यात आले. सकाळी ०६.०० वा. मॅरेथॉन स्पर्धा सुरु होऊन सकाळी ९.०० वा. सांगता करण्यात आली. महामॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, हुडी बॅग, पदक व सहभागीतेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढावा यासाठी झुंबा डान्स, डीजेची सोय करण्यात आली होती. तसेच या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर करण्यात आले. सदर महा मॅरेथॅान स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणुन मायाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज वडसा, लॉयड्स मेटल्स सुरजागड, डायरेक्टरेट सोलरीस नागपुर, अजयदिप कंन्स्ट्रक्शन, एसबीआय बँक गडचिरोली, जिल्हा नागरी सहकारी बँक गडचिरोली, सुरजागड ईस्पात एटापल्ली, कल्पना हॉस्पीटल वडसा, डेगानी विशाल राईस मिल वडसा, आश्रय आस्था गडचिरोली, ॲक्सीस बँक गडचिरोली, एल.आय.सी. गडचिरोली, गुरुबक्षाणी कन्सट्रक्शन गडचिरोली, डोंगरवार प्लांट गडचिरोली, लक्ष्मी राईस मील गडचिरोली व किसनराव खोब्राागडे सोसायटी आरमोरी यांनी हातभार लावून मोलाचा वाटा उचलला. सदर स्पर्धा ही जिल्हा परिषद मैदानापासून सुरु होऊन चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौक, रिलायंस पेट्रोलपंप, कारगील चौक, इंदिरागांधी चौक, ट्रेंड्स मॉल, बोधली चौक पासुन परत जिल्हा परिषद मैदान या मार्गे घेण्यात आली.

यानंतर गडचिरोली पोलीस दलास जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांच्या वतीने माओवाद विरोधी अभियान व चार्ली पेट्रोलिंग करीता प्राप्त २० चारचाकी व ५४ दुचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म.रा. यांच्या हस्ते व धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री म.रा., अशोक नेते खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र, देवराव होळी विधानसभा सदस्य गडचिरोली, कृष्णा गजबे विधानसभा सदस्य आरमोरी, पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान नागपूर संदिप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता आणि ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून पार पडला. तसेच गडचिरोली पोलीस दलास पोलीस अधिकारी व अंमलदारकरीता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुबंई यांचे द्वारा मंजुर मौजा विसापुर येथील ३६४ नवीन पोलीस निवासस्थानाचे भुमीपुजन उपमुख्यमंत्री यांचे हस्ते करण्यात आले.

त्यानंतर उपविभाग हेडरी अंतर्गत पोस्टे वांगेतुरी येथे आयोजित जनजागरण मेळाव्यास उपस्थित राहुन उपमुख्यमंत्री तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान नागपुर, संदीप पाटील पोलीस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच जनजागरण मेळाव्यात उपस्थित नागरिकांना स्प्रे पंप, टी-शर्ट लोअर, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी (मोठे गंज, स्टील बकेट, चमचे, वाटे इ.) तसेच शालेय मुलांना व्हॉलीबॉल किट, क्रिकेट किट, सायकल सारख्या उपयोगी वस्तु व इतर भेटवस्तु दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबध्द असुन, येथील सामान्य जनतेस सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत आश्वासित केले तसेच जनतेनी माओवाद्यांच्या भुलथापांना बळी पडु नये असे सांगितले. यावेळी मौजा-वांगेतुरी परिसरातील १ हजार च्या जवळपास नागरिक मेळाव्यास उपस्थित होते.

उपरोक्त कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे नेतृत्वात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss