Latest Posts

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा गडचिरोली दौरा विविध कार्यक्रमांनी संपन्न

– उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत पार पडला पोस्टे बारगुंडा येथील नवीन प्रशासकिय इमारतीचा उद्घाटन सोहळा व जनजागरण मेळावा
– जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांना विविध साहित्यांचे वाटप.
– सन २०२२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पोमकें सुरजागड येथे दिली भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा आज १७ डिसेंबर २०२३ रोजी गडचिरोली जिल्हा दौरा पार पडला. गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिन जिल्हा असून येथील भामरागत उपविभागांतर्गत येत असलेल्या दुर्गम भागातील पोलीस स्टेशन नारगुंडा नविन प्रशासकिय इमारत उ‌द्घाटन तसेच पोलीस दादालोरा खिडकीमार्फत जनजागरण मेळावा उपमुख्यमंत्री व ना. राजे धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री म.रा. मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला पारंपारिक आदिवासी रेला नृत्य सादर करुन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी पोस्टे नारगुंडा अंतर्गत सुरक्षा गार्ड (मोर्चा), पोलीस अधिकारी व अंगलवारांचे बॅरेंक, एसआरपीएफ अंगलदार बॅरेंक, इत्यादींना भेट देवून पोलीस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच आयोजीत जनजागरण मेळाव्यात उपस्थित नागरिकांना शासकिय प्रमाणपत्राचे वाटप, स्प्रे पंप, शालेय मुलांना सायकल, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, ड्रेस, लोणचे पापड किट, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी (मोठे गंज, स्टील बकेट, चमचे, वाटे इ.), धोतर, टी-शर्ट, लोअर, ब्लैकेट, स्वेटर, बेडशिट, महिलांना साड्या व इतर भेटवस्तु दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी मदत करत असून, सुविधा देण्यासाठी प्रयत्नशिल आहे. गडचिरोली पोलीस प्रशासन दुर्गम भागात करीत असलेल्या कामाबद्दल त्यांनी कौतुक करुन पुढेही शासन दुर्गम भागाचा विकास करण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करुन देणार असल्याबाबत त्यांनी सांगितले.

यासोचतच नागरिकांमध्ये मिसळून महिला व विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधत अनेक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबद्दल तसेच महिलांना व लहान मुलांना आरोग्याच्या सुविधांबाबत विचारणा करुन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

यासोचतच ना. राजे धर्मरावबाचा आत्राम यांनी शासनाने सुरु केलेल्या नवनविन योजना व सुविधा याबाबतची माहिती गोंडी भाषेमध्ये देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मौजा- नारगुंडा परिसरातील ५०० च्या जवळपास नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.

यासोबतच सन २०२२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र, सुरजागड येथे भेट देऊन येथील जवानांशी संवाद साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री, यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहीली.

सदर कार्यक्रमप्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री म.रा. मुंचई ना. राजे धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड बापूराव दडस हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आभार अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांनी मानले असून सुत्रसंचालन पोउपनि, भारत निकाळजे यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड बापूराव दडस, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोस्टे नारगुंडाचे प्रभारी अधिकारी, सतीश बेले व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss