Latest Posts

देसाईगंज पोलिसांनी जप्त केला सुगंधित तंबाखू : ३३ लाख ५० हजार ४८० किंमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपी जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हयात अवैध सुगंधीत तंबाखु तस्करी (Illegal flavored tobacco smuggling) व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज ११ सप्टेंबर २०२३ रोजी अवैद्यरित्या प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची (Non-medically restricted flavored tobacco) वाहतुक होणार आहे. अशी खबर पोअं/५५३८ ढोके पोस्टे देसाईगंज यांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार राऊत, ढोके सराटे, कुमोटी असे सापळा रचुन ईसम नामे १) आशिष अशोक मुळे (३०) वर्ष, रा. खरबी, पोस्टे खेड, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर २) अतुल देविदास सिंधीमेश्राम (२९) वर्ष, रा. भवानी वार्ड ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर यास पकडले व त्याचे ताब्यातुन १) लाल रंगाची टाटा कंपनीची आयशर वाहन क्र. एमएच ४० सिएम ६५५२ कि. अंदाजे. १० हजार /- रुपये २) २४ नग मोट्या पांढ­या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी ६ नग पांढ­या रंगाचे कट्टे व त्या प्रत्येक कट्यामध्ये ११ नग पॅकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत ६४० रुपये असे एकुण १० लाख १३ हजार ७६०/- रुपये ३) २१ नग मोट्या हिरव्या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी ४ नग पांढ­या रंगाचे कट्टे व प्रत्येक कट्टयामध्ये ४४ नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत ३ हजार १००/- रुपये असे एकुण ११ लाख ४५ हजार ७६०/- रुपये ४) १४ नग लहान पांढ­या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येक कट्यामध्ये ४४ नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत ३१० रुपये असे एकुण १ लाख ९० हजार ९६०/- रुपये असा एकुण ३३ लाख ५० हजार ४८० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदर बाब अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना माहिती देण्यात आली. तसेच पो.स्टे. देसाईगंज येथे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांचे फिर्यादी वरुन गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचे नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोअं/दिनेश राऊत, नरेश कुमोटी, विलेश ढोके व संतोष सराटे यांनी पार पाडली आहे.

Latest Posts

Don't Miss