Latest Posts

देवेंद्र फडणवीस यांनी केली गडचिरोलीत हवाई पाहणी @Dev_Fadnavis

गडचिरोली #गडचिरोली:

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आज #एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील पोलिस ठाण्याची नवीन प्रशासकीय इमारत आणि शिपायांच्या निवासस्थानांचे लोकार्पण करण्यात आले. #नागपूर येथील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी गडचिरोली जिल्ह्याला आज भेट दिली. काही कामांची हवाई पाहणी केली तर एका ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुरजागड येथे पोलीस मदत केंद्र, पुरुष वसतीगृह व महिला वसतिगृहाचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या #गडचिरोली जिल्ह्यातील कोठी कोरनार पुलाचे झाले उद्घाटन. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी या पुलाची हवाई पाहणी केली. पुलाअभावी पावसाळ्यात येथील १६ गावांचा पूर्णपणे संपर्क तुटत होता. आता पुलामुळे सुविधा झाली. समृद्धी महामार्ग झाल्यामुळे नागपूर आणि विदर्भ हे देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल होणार आहे, १ हजार एकरावर अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क आपण तयार करतोय, आज मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येतायत, गडचिरोली सारख्या ठिकाणी २० हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट स्टीलमध्ये होत आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Latest Posts

Don't Miss