Latest Posts

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी घेतली विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची भेट

– विद्यार्थिनींवर योग्य ते उपचार करून तब्येतीकडे लक्ष देण्याचे दिले सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेततील १०६ विद्यार्थ्यांनीना विषबाधा झाल्याची घटना घडली. त्यावेळी त्या विद्यार्थिनींना धानोरा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. ८० मुलींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलवण्यात आले.

या घटनेची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांना मिळताच त्यांनी उपजिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.सोळंकी यांना संपर्क करून विद्यार्थिनींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सदिच्छा भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधले व त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केले. रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस यांना विद्यार्थिनींवर योग्य ते उपचार करून त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असे सूचना दिल्या.

त्याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा जेष्ठ नेते रमेश भुरसे, भाजपा लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, उपजिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. सोळंकी, धानोरा तालुका अध्यक्षा सौ. लता पुंघाटी, शाम वाडई इत्यादी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss