विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आलापल्ली (Alapalli) : राज्यभरात पावसाळ्याचा जोर ओसरला असुन थंडीची चाहूल सुरू झाली आहे, अशातच पितृछाया स्वंयसेवी संस्था तथा राजे फाउंडेशन, आलापल्ली यांचा तर्फे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभ हस्ते आलापल्लीतील नवरात्राचा शुभ पर्वावर असंख्य गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात राजे अब्रीशराव महाराज बोलताना मी शब्दाचे पक्के, आणि आश्वासन देऊन मागे हटणे माझ्या स्वभावात नाही, लोकं मनापासून खूप प्रामाणिक असतात. आणि प्रेमळ सुद्धा, पण कोणाचेही हृदय दुखावण्याचा माझ्या रक्तातच नाही असे महाराज बोलले आणि माझ्यात सत्य स्वीकारण्याचे आणि बोलण्याचे धैर्य आहेच. मी नेहमीच इतरांना मदत करायला तयार असतोच असे महाराज वेक्त केले.
अब्रीशराव महाराज नागरीकांचे समस्या जाणून घेतले. कार्यक्रमात उपस्थित पितृछाया स्वंयसेवी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश गोरखनाथ शेंडे, भाजपाचे अभिजीत शेंडे, मोहन मदणे, फ्रॅक्लीन सलम, शहर अध्यक्ष, दिपक त्तोगरवार, अंकुश शेंडे, शहर उपाध्यक्ष, हर्षीद वर्मा, शहर उपाध्यक्ष, राजस्मीत पोचमपल्लीवार, सागर बिट्टीवार, शकुंतला दुर्गम, सुरेश तलांडे, सिनु नामणवार, मायाताई बासनवार, रापत्तीवार, जागृती कांन्नाबार तसेच भाजपा पदाधिकारी व मंडळाचे सर्व सदस्य, आलापल्लीतील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.