– खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
या बैठकीला नियोजन दरम्यान भाजपाच्या आगामी विधानसभा निहाय मेळावे, तालुका निहाय कार्यकारिणी, सर्व भाजपा आघाडीच्या कार्यकारणी पूर्ण करणे, शक्ती केंद्रप्रमुखाची बुथावरील जबाबदारी, संपूर्ण बुथावरील प्रवासाचे नियोजन करणे, नव मतदार नोंदणी करणे, सरल ॲप डाऊनलोड करणे, मोदी अँप असे विविध प्रकारचे नियोजनबद्ध काम व्हावे. यासाठी आगामी कार्यक्रमाकरिता गडचिरोली जिल्हा भाजपाची नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
या बैठकीला प्रामुख्याने लोकसभा विस्तारक तथा जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षा गिता हिंगे, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला शहराध्यक्षा कविता उरकुडे या बैठकीला प्रामुख्याने उपस्थितीत होते.