Latest Posts

जि.प. माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी श्रीगणरायाची महाआरती व महाप्रसादाचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतात. यावर्षी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत अहेरी तालुक्यात सगळीकडे बाप्पाचा प्रतिष्ठापणा मोठा उत्साहात पार पडला.

यात विशेष म्हणजे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या मूळ गाव असलेल्या इंदाराम येथे त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रीगणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत असतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा इंदाराम येथे माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. इंदाराम येथे कंकडालवार परिवाराने श्रीगणरायांची विधिवत पूजा, महाआरती करून महाप्रसादचे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या महाप्रसाद कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडोभाविक भक्तजण उपस्थित राहून श्रीगणरायाची दर्शन घेऊन महाआरतीत सहभाग होऊन तदनंतर महाप्रसादाची आस्वाद घेतले.

इंदाराम येथे आयोजित श्रीगणेशाची महाआरती गोपाळकाल व महाप्रसाद कार्यक्रमाला मातोश्री मंदाबाई कंकडालवार, माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार, अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सोनाली अजय कंकडालवार, इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार, स्मिता वैभव कंकडालवार, युवराज कंकडालवार, विराज कंकडालवार, ऋतुराज कंकडालवार, रिध्वी कंकडालवार, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडसेलवार, लक्ष्मण आत्रामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच काकळ आरती सेवा समिती आणि गुरुमाऊली भजन मंडळातील सर्व पदाधिकारी तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss