Latest Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी सन २०२४-२५ साठी नविन सुधारीत अनुदानानुसार अनुसुचित जाती नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे यांनी केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत नविन विहिर बांधन्याकरीता ४ लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्ती करीता १ लाख रुपये, १० अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचाकरीता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या डिझेल किंवा विद्युत पंप संचाकरीता ९०% किंवा ४० हजार रुपये, विज जोडणीकरीता २० हजार रुपये, इनवेल बोरींग करीता ४० हजार रुपये, सोलर पंपारीता ५० हजार रुपये, शेततळ्याचे अस्तरीकरणाकरीता २ लाख  रुपये, बैल चलित किंवा ट्रॅक्टर चलीत यंत्र सामग्री अवजारे करीता ५० हजार रुपये, तुषार सिंचन करीता १५% किंवा ४७ हजार रुपये व ठिंबक सिंचन करीता १५% किंवा ९७ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत नविन विहिर बांधन्याकरीता ४ लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्ती करीता १ लाख रुपये, १० अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचाकरीता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या डिझेल किंवा विद्युत पंप संचाकरीता ९०% किंवा ४० हजार रुपये, विज जोडणीकरीता २० हजार रुपये, इनवेल बोरींग करीता ४० हजार रुपये, सोलर पंपारीता ५० हजार रुपये, शेततळ्याचे अस्तरीकरणाकरीता २ लाख  रुपये, बैल चलित किंवा ट्रॅक्टर चलीत यंत्र सामग्री अवजारे करीता ५० हजार रुपये, परसबाग करीता ५ हजार रुपये, तुषार सिंचन करीता १५% किंवा ४७ हजार रुपये, ठिंबक सिंचन करीता १५% किंवा ९७ हजार रुपये व केवळ वनक्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांना विंधन विहिरकरीता ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

दोनही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे, त्यांच्याकडे स्वत:चे नावे ०.४० हेक्टर व कमला ६ हेक्टर शेतजमीन असावी. त्यांच्या नावे जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असावा. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य राहणार आहे. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. बँक खाते आधार संलग्नीत असणे आवश्यक आहे. एकदा संबंधीत योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यांस किंवा कुंटूंबास या योजनेचा लाभ देय असणार नाही. तसेच नविन विहिरीचा लाभ घेतल्यास लाभार्थ्यांस २० वर्षानंतर जुनी विहिर दुरुस्ती या घटकाखालील लाभ देय राहील. सदर लाभ घेतल्यास लाभार्थ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर त्याबाबतची नोंद घेण्यात येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसुचित जाती नवबौध्द घटकातील असावा. व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसुचित जमाती घटकातील असावा. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यापात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रास https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/login/login या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधीत पंचायत समितीच्या कृषि विभागात किंवा जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे कृषि विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss