Latest Posts

डॉ. कविता उईके यांना आचार्य पीएच.डी. पदवी बहाल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारे संचालित फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. कविता वामनराव उईके यांना मानव्य विद्याशाखे अंतर्गत सोशल वर्क या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर तर्फे नुकतीच आचार्य पदवी बहाल करण्यात आली.

त्या फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथील आचार्य (पीएच.डी.) पदवी मिळविणाऱ्या पहिल्या महिला प्राध्यापिका आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय तृतीयपंथीयांचे समायोजन व पुनर्वसनात्मक अध्ययन व समाजकार्याची मध्यस्थी (विशेष संदर्भ – विदर्भ, छत्तीसगढ व मध्यप्रदेशातील काही निवडक शहर) या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या शोध प्रबंधातून नक्कीच तृतीयपंथीयांचे समायोजन व पुनर्वसन होण्यास मदत होईल.

शोध प्रबंधाकरिता प्रा. डॉ. नंदाश्री भुरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपला शोध प्रबंध नागपूर विद्यापीठाला थोटे कॉलेज ऑफ सोशल वर्क, नागपूर या संशोधन केंद्राकडून सादर केला होता. या यशाबद्दल त्यांचे त्यांच्या कुटुंबाकडून, महाविद्यालयाकडून व मित्र-मैत्रिणीकडून अभिनंदन करण्यात आले.

Latest Posts

Don't Miss