– मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी धरला ठेका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या राजवाड्यातील दुर्गा देवी विसर्जन मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी विसर्जन मिरवणुकीत अहेरीकरांनी एकच धमाल करत थिरकले तर कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पारंपरिक आदिवासी नृत्य आणि डिजे वर ठेका धरला.
दरवर्षी दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अहेरीत विसर्जन मिरवणुकीचा माहोल असतो. यावेळी विसर्जन निमित्य मोठ्या प्रमाणत रोषणाई करत विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले. त्यात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या राज परिवारातील सदस्यांसोबतच अहेरीकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. एकच जल्लोष करत देवी विसर्जन मिरवणुकीत सहभाग झाले.
मंत्री धर्मराव बाबा आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी प.स. सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी ढोल ताशाच्या गजरात चाललेल्या मिरवणुकीत ठेका धरल्याने उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला.