Latest Posts

निवडणुकीदरम्यान समन्वयाने काम करा : जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते

– आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधि / भंडारा (Bhandara): आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध विभागाशी समन्वयाने काम करावे. तसेच निवडणुकीच्या दरम्यान सोपवलेल्या जबाबदारीचे व कर्तव्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव गाठीशी घेऊन निवडणुक आयोगाच्या निर्देशांचे या वेळी अधिक जबाबदारीने पालन करुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नुकतेच  निवडणुकीसंदर्भात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील एकत्रित एक दिवसाचे प्रशिक्षण निवडणूक विभागाच्या वतीने  नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन सभारंभात जिल्हाधिकारी डॉ. कोलते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीसंदर्भात विविध प्रकारच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. या सूचना संदर्भात कोणाला शंका असल्यास त्या संदर्भातील समाधान हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या जाते. तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेता निवडणूक विभागातर्फे संकेतस्थळावर येणाऱ्या सूचना व त्याची अंमलबजावनी सर्वांनी दक्षतेने करावी, असे डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या कामासंदर्भात कोणताही चुका या सहन केल्या जात नाहीत. जाणिवपूर्वक जर कोणी चुका केल्या तर अशा व्यक्तीविरुध्द कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणाचे  प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी केले. एकूण पाच सत्रामध्ये हे प्रशिक्षण देण्यात आले. यात भूसंपादन सहायक आयुक्त भूसंपादन शिल्पा सोनाले, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी तुमसर दर्शन निकाळजे यांनी मार्गदर्शन केले.

Latest Posts

Don't Miss