Latest Posts

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा अहेरी येथील ऐतिहासिक दसरा मोहोत्सवात जोरदार घणाघात

– रस्तात खड्डा की खड्डात रस्ता… अहेरी विधानसभा क्षेत्राची गेल्या ४ वर्षात प्रचंड दुरावस्था

– अहेरी इस्टेटचा १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या दसरा मोहोत्सवाला महाराष्ट्र, तेलंगाणा, छत्तीसगड ह्या राज्यातील हजारो लोकांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी इस्टेटचा १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला दसरा महोत्सव काल अहेरी इस्टेटचे ६ वे राजे श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी बोलतांना राजे मनाले दसरा ही आपली ऐतिहासिक संस्कृती आहे. गेल्या १५० वर्षांपासून अखंडपणे चालू आहे, समोरही शेकडो वर्षे चालू राहील, अहेरी इस्टेटचा दसरा महोत्सवाचे महत्त्व कमी व्हावे यासाठी काही लोकं अनेक प्रयत्न करीत आहेत ते कदापी यशस्वी होणार नाही, तसेच सद्या आपल्या क्षेत्रात सर्वत्र रस्तात खड्डा की खड्डात रस्ता आहे, हेच समजत नाही, अहेरी विधानसभा क्षेत्राची गेल्या ४ वर्षात प्रचंड दुरावस्था झाली आहे.

या परिस्थितीला जबाबदार कोण आहे. याचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथील ऐतिहासिक दसरा मोहोत्सवात बोलतांना जोरदार घणाघात विरोधकांवर केला.

तत्पूर्वी दसऱ्याच्या दिवशी परंपरे प्रमाणे सकाळी साईबाबा पालखी अहेरी राजनगरीचा मुख्य मार्गाने राजेंचा उपस्थितीत काढण्यात आली. तर संध्याकाळी ऐतिहासिक पालखीत विराजमान होहून श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सीमोल्लंघन करीत गडअहेरी येथे शमीचा वृक्षांचे पूजन तथा गडी मातेचे पूजन करीत पालखी राजमहालात परत आले. यावेळी अहेरी राजपरिवारासाचे सर्व सदस्य तसेच या दसरा मोहोत्सवाला महाराष्ट्र, तेलंगाणा, छत्तीसगड ह्या राज्यातील हजारो लोकांची उपस्थिती होती.

Latest Posts

Don't Miss