Latest Posts

खा. अशोक नेते यांच्या हस्ते भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीरांचे उद्घाटन

– गडचिरोली शहरातील लांझेडा व इंदिरानगर येथे संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर शक्तीकेंद्र यांच्या वतीने देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने सेवा पंधरवाडा या कार्यक्रमानिमित्य भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर तथा नमो प्रदर्शनी, आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड नोंदणी वाटपाचा कार्यक्रम लांझेडा, इंदिरानगर येथे बाल गणेश मंडळा जवळ आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमा निमित्याने खासदार अशोक नेते यांनी दीपप्रज्वलन करुन गणपती बाप्पा चे दर्शन घेत शहरातील लांझेडा, इंदिरानगर येथे भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरांचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करून स्वतः शुगर बीपी तपासून शुभारंभ करून यांचा शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी याप्रसंगी केले. या निमित्य जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी सुद्धा बीपी शुगर तपासणी केली.

यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते रमेश भुरसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, माजी न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री विनोद देओजवार, शहर महामंत्री हर्षल गेडाम, भाजपाचे श्याम वाढई, नरेश हजारे, कान्हो लोहंबरे तसेच मोठया संख्येनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इंदिरानगरातील बाल गणेश मंडळाचे सदस्यगण उपस्थितीत होते.

Latest Posts

Don't Miss