Latest Posts

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

– धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिरोच्या येथे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : स्नेह संमेलन हे केवळ नाट्य, नृत्य याचा आविष्कार न राहता ते विचारांचे अंतर्मुख करणारे संमेलन बनावे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे असे धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी स्नेह संमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात एकाग्रतेने आणी जिद्दीने कठोर परिश्रम घेतल्यास यशाच्या शिखरा पर्यत पोहचण्यास कोणीही थांबवू शकत नाही असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिरोच्या येथे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी नाट्य व नृत्याच मनमोहक, आकर्षक सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे उदघाटक व अध्यक्ष म्हणून धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राजमाता राणी रुक्मिणी देवी, युवा नेते अवधेरावबाबा आत्राम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, शहराध्यक्ष दिलीप सेनिगरापू, जेष्ठ नेते रंगू बापु, भाजप प्रकोष्ठ संतोष पडलवार, पत्रकार इरफान, शाम बेंजनवार हे होते.

स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य तगरे यांनी केले तर सूत्र संचालन प्यारेलाल उमरे आणि आभार रमण कोमेरा यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss