Latest Posts

विदर्भ न्यूज एक्सप्रेसच्या आठवा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

– गडचिरोली विधान सभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रामुख्याने उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : आज विदर्भ न्यूज एक्सप्रेस या ऑनलाईन वेब पोर्टल व ई – न्यूज चॅनलला ७ वर्षे पूर्ण होत असून आठव्या वर्षात पदार्पण केला आहे त्यानिमित्य आठवा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला.

यावेळी गडचिरोली विधान सभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनीं विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे भरभरून कौतुक केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, ज्येष्ठ नेते दामोधर अरीगेला, भाजपचे आदिवासी सेल चे नेते प्रकाश गेडाम, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके आणि विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक ऍड . मनीष कासर्लावार उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिले.

Latest Posts

Don't Miss