Latest Posts

वीज ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणचे ऊर्जा चाट बोट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महावितरणच्या वीज ग्राहकांना तक्रार निवारण, बिल भरणा, नवीन वीजजोडणी अशा विविध कामांसाठी मदत मिळावी याशिवाय त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारीत चॅट बॉट सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या महावितरणच्या http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, लवकरच ती मोबाईल फ़ोन ॲप्लिकेशनवर देखील उपलब्ध होणार आहे.

अनेकदा ग्राहकांना महावितरणच्या सेवेबाबत अडचणी येतात. प्रत्येकवेळी कार्यालयात जाऊन त्या अडचणींचे निराकारण करणे शक्य होत नाही, अशावेळी कुणाला तरी प्रश्न विचारून उत्तरे मिळाल्यास बरे होते. अधिकाऱ्यांना देखील रात्री- अपरात्री प्रश्न विचारणे योग्य ठरत नाही. वीज ग्राहकांची ही अडचण लक्षत घेता महावितरणने चॅट बॉट सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांनी प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर काही क्षणातच मिळत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मुंबई येथे करण्यात आले.

या चाट बोट चा वापर करुन नवीन घरगुती, व्यावसायिक, कृषी आणि औद्योगिक वीज जोडणीच्या मागणिसाठी, नवीन वीज जोडणीच्या अर्जाची सद्यस्थिती, वीजबिल कॅल्क्युलेटर, वीज देयक तपशील व भरणा, जलद वीज देयक भरणा, तक्रार नोंदणी, संपर्क तपशिल अद्यतनित करणे, स्वत: मीटर वाचन सबमिट करणे, गो ग्रीन नोंदणी, इतर शुल्कांचे ऑनलाईन पेमेंट याची माहिती आणि सेवेचा लाभ घेऊ शकता.

जलद आणि कार्यक्षम सुविधेसाठी चॅट बॉट सेवा –
– ऊर्जा चॅट बॉट मुळे ग्राहकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही
– दिवसाचे चोवीस तास आणि सप्ताहाचे सातही दिवस सेवा उपलब्ध,
– सुरुवातीला कंपनीच्या वेबसाइटवर त्यानंतर मोबाईल ॲपवर उपलब्ध होणार
– महावितरणशी संबंधित ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करणार
– ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व त्यातून ग्राहकांना मार्गदर्शन
– ग्राहकांच्या प्रश्नांची त्वरित आणि कार्यक्षमपणे उत्तरे मिळणार.
– महावितरणची सेवा अधिक जलद आणि ग्राहकोभिमुख होईल.
– ही सेवा मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध.
– सर्व वयोगटातील आणि तांत्रिक कौशल्यांच्या वापरकर्त्यांसाठी सुविधाजनक.

ग्राहकांना अनेकदा अडचणी येतात अशावेळी कुणाला विचारायचे असा प्रश्न निर्माण होतो. ही समस्या लक्षात घेऊन नागरिकांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss