Latest Posts

एटापल्ली तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

– विजेत्यांना बक्षीस वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : एटापल्ली येथे तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये तालुक्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला तर अंतिम दुहेरी सामन्यात राहुल घोष व मनीष ढाली संघाने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद अमित सोनी व प्रशांत कुलयेटी यांना मिळाले. तसेच पुरुष (सिंगल) सामन्यात राहुल घोष याने विजेतेपद पटकावले व प्रशांत कुळयेटी याने उपविजेतेपद पटकावले.

सदर स्पर्धेचे आयोजन मनीष ढाली यांनी केले. या सर्धेमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीप, राजा, राज विलन, शुभम म्हेत्रे, मुंडे, प्रा. राहुल ढबाले, प्रा. भारत सोनकांबळे आदी उपस्थित होते.

पुरुष (सिंगल) व पुरुष (डब्बल) प्रथम बक्षीस म्हणून १० हजार, ८ हजार, ६ हजार असे अनुक्रमे पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रा. राहुल ढबाले यांनी केले. स्पर्धाच्या यशस्वीतेसाठी मनीष ढाली, राहुल घोष, प्रशांत कुळयेटी, अमित सोनी, अनुप सरकार, बादल सोनी, प्रेम मजुमदार, प्रीतम दत्ता, जोजो बेपारी, यांनी अथक परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss