Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी केली खेळाडूंना आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : तालुक्यातील युवक तेजस संगीधवार यांनी जिल्हा स्तरावरील MIDC गडचिरोली ग्राऊंड येथील १०० मीटर धावण्यामध्ये दुसरा नंबर पटकावला आहे तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला नंबर पटकावला आहे. असे धावपटू तेजसने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहुन तरी सुद्धा जिल्ह्यात दोन नंबर या धावपटू ने पटकावला या धावपटूला ३७ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर १८ आणि २० वर्षा खालील एथलेटिक्स चॅम्पियशिप २०२३ नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तेजस यांना बोलावण्यात आली आहे. तेजस यांची घरीची परिस्थिती हलकीची असल्याने त्यांना नाशिक जाण्यासाठी अडचण भासत होते. युवक तेजस यांनी आज माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अहेरी निवास्थानी येथील भेट घेऊन त्यांचे परिस्थिती सांगण्यात आले होते.

त्यावेळी अजय कंकडालवार यांनी म्हंटले की, धावणे म्हणजे प्रत्येक क्रीडा प्रकाराचा गाभा आहे.तुम्ही उत्तम धावत असाल तर प्रत्येक क्रीडा प्रकारात लौकीक मिळवू शकता. खेळावर प्रेम, श्रद्धा असेल तर यश सहज मिळेल. असे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी युवक तेजस संगीधवार यांना सांगत राज्यस्थरीया येथील होणाऱ्या स्पर्धेसाठी जाण्यासाठी माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी तेजस संगीधवार यांना आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी उपस्थित माजी जि.प. सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, राकेश अल्लूरवार, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss