Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी कार्यकर्त्यांसह एमएसईबी कार्यालयात जाऊन विचारला जाब

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : सिरोंचा तालुका वाशियांनी वारंवार एमएसईबी ला तक्रार करून सुध्दा अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे थेट माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी एमएसईबी कार्यालय सिरोंचा गाठले.

अधिकाऱ्यांना तालुक्यात चालू असलेला विजेचा लपंडाव, काही वेळेला तर लाईट खेड्यापाड्यात २ ते ३ दिवसाच्या मुक्कामाने जाणे, तसेच ठेकेदारांचां दिरंगाईत चालू असलेला मेंटेनन्स व शेतकऱ्यांना वापरानुसार विज बील न देता सरसकट बिल वसूली करुन चालू असलेली लुटमार, या सर्व विषयांवर माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी येथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी तालुका रा.का. पार्टीचे अध्यक्ष मधुकार कोलूरी, युवाध्यक्ष M.D. शानू, नगरसेवक सतीश भोगे, माजी नगरसेवक रवि रालाबंडीवार, गणेश बोधनवार, चेतन राव, मदनया महदेशी, रवि सुल्तान, देवा यनगणदुला व रा.का. पार्टी सीरोंचा चे पदाधिकरी व कार्यकर्ते देखील उपस्थीत होते.

Latest Posts

Don't Miss