– आलापल्लीचा लाडका राजाचे घेतले दर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी सोमवारी आलापल्ली येथील लाडका राजा गणेश मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले तसेच महाप्रसाद वितरण केले.
आलापल्ली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार गणरायाचे प्रतिष्ठापना करण्यात आले. याठिकाणी दररोज सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. २५ सप्टेंबर रोजी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
भाग्यश्री आत्राम यांनी आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ येथे भेट देऊन दर्शन घेत विधिवत पूजा केले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण केले. यावेळी सरपंच शंकर मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, ग्रा.प. पुष्पा अलोने, सदस्य मनोज बोलूवार, अनुसया सप्पीडवार, वशील मोकाशी, पराग पांढरे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.