विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी तालुक्यातील किष्टापुर दोडगिर येथील किष्टा मडावी (५४) आपल्या शेतात पिकाला औषधी फवारणी करतांना अचानक पणे त्याचा नाकात औषधी गेल्याने ते आपल्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडले.
पुढील उपचारासाठी तात्काळ अहेरी येथे ग्रामीण रुग्णालय दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना त्यांना आपला प्राण गमवावा लागला. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शव घेऊन जाण्यासाठी त्यांना आर्थिक मदतची अत्यंत गरज होती.
सदर विषय भाजपचे विकास तोडसाम, विनोद जिल्लेवार यांच्याद्वारे राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच क्षणाचा विलंब न करता शव स्वगावी नेण्यासाठी अहेरी नगरपंचायत येथील स्वर्गरथ या वाहनात डिजल टाकून वाहन उपलब्ध करून दिली. व त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली.
यावेळी भाजपचे विकास तोडसाम, विनोद जिल्लेवार, साई मुडपल्लीवर, सारंग रामगिरीवार आदी उपस्थित होते.