Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी कालीमातेचे दर्शन घेऊन बंगाली बांधवांशी साधला संवाद

– शांतिग्राम, कालीनगर, विजयनगर, गांधीनगर येथील कालीमाता उत्सवात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिति
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मूलचेरा (Mulchera) : मूलचेरा तालुक्यातील बंगाली बहुल शांतिग्राम, कालीनगर, विजयनगर, गांधीनगर येथे दिपावली पासून श्री कालीमाता पूजा महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या कालीपूजा महोत्सवाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी काल उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करीत कालीमातेचे दर्शन घेतले, यावेळी कालीमाता उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित बंगाली बांधवांशी राजेंनी आस्थेने संवाद साधत दिपावली तथा काली माता उत्सवाचे सर्वांना शुभेच्छा दिल्या, तसेच ह्याप्रसंगी कालीमाता उत्सव समिती तर्फे राजेंचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच आवर्जून भेट दिल्याबद्दल राजेंचे आभार ही मानण्यात आले.

यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा, माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, रवी नेलकुद्री, संतोष उरेते, सुभाष गणपती, भाजपा तालुका अध्यक्ष संजू सरकार, विकास तोडसाम, वैष्णव ठाकूर यांच्यासह परिसरातील बंगाली बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Latest Posts

Don't Miss