विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी येथील स्थानिक स्व. राजे विश्र्वेशराव महाराज चौकातील विठ्ठल रखुमाई मंदिरात जगन्नाथ एच पी गॅस सर्व्हिस अहेरी (ग्रामीण) तर्फे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत ६२ लाबार्त्यांना वितरण सोहळा माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते काल २९ डिसेंबर रोजी पार पडले.
या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी राजे अंब्रिशराव आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून गजानन राहूलवार मंचावर उपस्थित होते.
सरकारच्या नवीनतम योजनापैकी प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY) ही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साल २०१६ मध्ये सुरु करण्यात आलेली सरकारी योजना आहे. दारिद्र्यरेषेखालील महिलांना तब्बल ५० दशलक्ष एलपीजी कनेक्शनचे वितरण करण्याची कल्पना या योजनेमार्फत करण्यात आली होती. मार्च २०२० पर्यंत या योजनेमार्फत आठ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दीष्ट सरकाने ठरवले होते.
योजनेची उद्दिष्टे असे आहे की, महिलाचे कष्ट दूर करणे व त्यांना साक्ष्मिकरणास चालना देणे.
यावेळी राजे अंब्रिशराव महाराज उज्ज्वला गॅस योजनेचा वाटप सोहलाच्या निमित्याने सांगितले की, या उज्ज्वला योजनेचा उद्दिष्ट हे महिलाचे कष्ट दूर करणे व त्यांना सक्षमीकरणास चालना देणे, या योजनेद्वारे स्वयंपाकासाठी इंधन पुरवणे, जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे खेड्यातील लोकांना विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवु लागतात. त्या टाळणे हे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा उद्दिष्ट असून आपण या योजनेचा जास्तीत जास्त महिला वर्गांनी घ्यावी आणि काही अडचण येत असल्यास आमच्या भाजपा कार्यकर्ता ची मदत घ्यावी.
या वितरण सोहळ्याला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समितीचे सर्व सदस्य तसेच ग्रामीण महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.