Latest Posts

भामरागड तालुक्यातील येचली येथील संतोष दुनलावार यांच्या कुटूंबाला मिळाला आधार

– माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून सुपरिचित असलेल्या भामरागड तालुक्यातील येचली येथील रहिवासी संतोष मालय्या दुनलावार हे रोजंदारी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असत, पण काही दिवसा अगोदर त्यांचे आकस्मिक अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या कुटूंबात पत्नी, आई, वडील हे आहेत. कुटुंबातील सद्स्य यांच्यावर खूप मोठ संकट आले आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत आल्याने पुढील जीवनाचा गाठा कसा चालवायचा हा प्रश ? निर्माण झाला.

पण ही संतोष मालय्या दुनलावार यांच्या कुटूंबाची परिस्थिती स्थानिक कार्यकर्ते यांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी राजे यांनी दुनालवार कुटूंबाला मदतीचा हात देत. कार्यकर्ते यांच्या माध्यमातून दुनलावार कुटूंबाला १० हजार रुपये कार्यकर्ते यांच्या हस्ते पाठवून आर्थिक मदत केली. दुनलावार कुटूंबाला सर्वोतोपरी सहकार्य करणार, असे आश्वासन दिले.

यावेळी राजे यांचे कार्यकर्ते वैभव पूज्जलवार, रमेश तलांडी, श्रीनिवास गुन्नालवार, शांतय्या कुंमरवार, श्रीनिवास दुर्गे, श्रीनिवास कटकेल, शंकर मादावर, शामराव कटकेल हे व दुनलावार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss