Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा तालुक्यातील अनेक मुलांना केली आर्थिक मदत

– क्रीडा स्पर्धकांना जोडे (शूज) खरेदीसाठी मिळाला आधार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : गडचिरोली पोलीस दलातर्फे दरवर्षी गडचिरोली महोत्सव तथा विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. त्या निमित्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील क्रीडा स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

सिरोंचा तालुक्यातील अनेक मुले कबड्डी या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या गावी मोकळ्या जागी कबड्डी सराव करत आहेत. पण सराव करतांना खूप अडचणी त्यांना होत आहे. कारण त्यांच्या पायाला जोडे (शूज) नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने महागडे जोडे (शूज) पायात घालून आपला सराव करणे व कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना अडचण निर्माण झाली होती.

सदर माहिती सिरोंचा येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी अहेरी इस्टेट चे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना सांगितली. त्यावेळी राजे यांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व मुलांना स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून १५ हजार रुपये किंमतीचे जोडे (शूज) खरेदी करून देत त्यांना मदत केली.

कबड्डी या क्रीडा स्पर्धेत यशस्वी होऊन आपल्या क्षेत्राच नाव लौकिक करा, असे म्हणत पुढील वाटचालीसाठी राजे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सिरोंचा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रीडा स्पर्धक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss