– पावसाच्या सरी झेलत बजरंग दल, सिरोंचा गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली, लोकांची तुडुंब गर्दी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम (Former Guardian Minister Raje Ambrishrao Atram) यांच्या प्रमुख उपस्थितीत सिरोंचा तालुका मुख्यालयात काल मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव (Dahi Handi festival) साजरा करण्यात आला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्याने राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यभरात काल दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आले. तर महाराष्ट्राचा शेवटचा टोक म्हणून ओळख असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्थानिक पटवारी कॉलनी मैदान येथे कान्हा मटकी फोड महिला मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धेसाठी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून २१ हजार प्रथम तर ११ हजार रुपयांचा दुसरा पारितोषिक देण्यात आला.
या दहीहंडी कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध भागातून गोविंदा पथकांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला होता. दहीहंडी फोडण्यासाठी तरुणांनी अनेक थर रचत दहीहंडी फोडली व आनंद घेतला. विशेष म्हणजे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे सिरोंचा तालुक्यात कालपासून मुक्कामाने होते. त्यांनी काल भाजप कार्यकर्त्यांची सभा घेऊन विविध समस्या जाणून घेतली. या कार्यक्रमासाठी आवश्यक ती मदत देऊन तरुणांचा उत्साह वाढविला. माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम मागील काही महिन्यांपासून सिरोंचा तालुका पिंजून काढत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दहीहंडी कार्यक्रम संपन्न होताच गोविंदा पथकांना राजेंचा हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. बजरंग दल सिरोंचा हा संघ ह्या स्पर्धेचा विजेता ठरला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते तसेच महिला व तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.