Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न

– माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून विजेत्या संघाला प्रथम २१ हजार तथा द्वितीय ११ हजार रुपये पारितोषिक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यातील कबड्डी संघ सहभागी झाले होते, युवा कबड्डी स्पर्धकांचा जोश व उत्साह यावेळी कबड्डी स्पर्धे दरम्यान पाहायला मिळाला.

माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देत असताना आणि आपल्या क्षेत्रातील युवकांना क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन आपले भविष्य क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून घडवावे आणि आपल्या क्षेत्राचे नावलौकिक करावे यासाठी ते नेहमी युवकांना प्रेरीत करत असतात, दरवर्षी अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील क्रीडा स्पर्धेसाठी पारितोषिके देत असतात.

यावेळी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून प्रथम क्रमांक विजेत्या, उडान संघाला शिल्ड व २१ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले तर द्वितीय क्रमांक विजेत्या, एस.आर. नगरम संघाला शिल्ड व ११ हजार रुपये पारितोषिक सिरोंच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी सिरोंच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शंकर नरहरी, सतीश सतोषपू, जीडी सत्यम, संपत दया, चंद्रशेखर चेतकरी, रवींद्र आलकरी, राम सीरंगी, शाहरुख पठाण, नागराजू गौरपु, आदर्श सीरंगी, आदर्श हे उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss