Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्य एटापल्ली येथे मॅराथॉन स्पर्धा संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : राजे अम्ब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री आदिवासी विकास व वने तथा माजी पालकमंत्री गडचिरोली यांच्या वाढदिवसानिमित्य विर बाबुराव सडमेक चौक एटापल्ली येथे प्रशांत आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा व मोहन नामेवार, गजानन खापने, सम्मा जेट्टी, सुरज मंडल, अनिकेत मामिडवार, मनिष ढाली, राजु गावतुरे व एटापल्ली येथील युवक मंडळ यांच्या वतीने १५ ऑक्टोबर २०२३ रोजी रविवारला सकाळी ०६:३० वाजता मॅराथॉन स्पर्धा आयोजित कार्यक्रम संपन्न झाले.

प्रथम पुरस्कार सौरव बंडु कन्नाके रा. चौडमपल्ली, द्वितीय पुरस्कार गणेश भगवान मडावी रा. गुरुपल्ली, तृतीय पुरस्कार अनिल राजु पदा रा. पारपनगुडा यांनी पटकाविला.

यावेळी सहकार्य पोलिस प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा आदी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss