Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तुमनूर, किष्टापूर, पेंटिपाका येथील नवरात्री उत्सव तथा बतकम्मा उत्सवासाठी केली मदत

– माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे बतकम्मा उत्सवात महिलांना साडी, DJ म्युझिक सिस्टिम तर विविध शारदा मंडळाला आर्थिक सहकार्य केले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (sironcha) : सिरोंचा तालुक्यात नवरात्री निमित्याने मोठ्या उत्साहात बतकम्मा उत्सव तथा दुर्गा, शारदा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या उत्सवात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभाग घेऊन DJ म्युझिक सिस्टिम लावून सामूहिक नृत्य करतात व बतकम्मा उत्सव तथा देवी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात.

तुमनूर येथील महिलांना बतकम्मा उत्सव साजरा करण्यासाठी DJ म्युझिक सिस्टिम खरेदीसाठी आर्थिक समस्या होती, ही तुमनूर येथील बतकम्मा उत्सव महिला मंडळ यांची म्युझिक सिस्टीमची समस्या कार्यकर्ते यांनी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या पर्यत पोहचवली. त्यावेळी राजे साहेबांनी तात्काळ कार्यकर्ते यांच्या माध्यमातून DJ म्युझिक सिस्टीम खरेदी करून आपल्या कार्यकर्ते यांच्या हस्ते पाठवून तुमनूर येथील महिलांना बतकम्मा उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी केली मदत, त्यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्या सारखा होता.

तसेच, किष्टापूर, पेटीपाका येथील शारदा महिला मंडळ यांना नवरात्री निमित्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्याकडून महिलांना साडी वाटप तसेच आर्थिक सहकार्य करण्यात आले.

यावेळी राजे अंब्रीशराव आत्राम यांचे कार्यकर्ते राम सिरांगी, शाहरुख पठाण, आदर्श सीरांगी, रजनीकांत बोले, सुरेश कुंदरपू व स्थानिक गावकरी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss