Latest Posts

पदवीच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीला मुदतवाढ : आज शेवटचा दिवस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदवीच्या तीन आणि चार वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठीच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मंगळवार ११ जूनला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही मुदतवाढ आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीसाठी https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. त्या महाविद्यालयांचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरणे देखील अनिवार्य आहे. विद्यापीठामार्फत प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून २५ मे ते १० जून २०२४ या कालावधीत ऑनलाइन नाव नोंदणी ते संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता.

मात्र या कालावधीत विद्यार्थ्यांला काही अपरिहार्य कारणास्तव नोंदणी ते अर्ज सादर करण्यास उशीर झाला असल्यास त्यांना संधी मिळावी. या उद्देशाने ही मुदतवाढ दिली जात असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाच्या नियमानुसार व वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी ही त्या-त्या महाविद्यालयामार्फत जाहीर केली जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss