Latest Posts

शेतकऱ्यांच्या पूरग्रस्त पिकांचे तात्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरता प्रामाणिकपणे सहकार्य करा

– खासदार अशोक नेते यांचे ब्रह्मपुरी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश
– आढावा बैठकीला माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची प्रमुख उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष खासदार अशोक नेते यांनी २७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहामध्ये पूरग्रस्त भागातील पिकांचा सखोल आढावा बैठक घेतली. या बैठकीला ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार तथा शेतकरी पुत्र आदरणीय प्रा. अतुल देशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोसेखुर्द धरणाच्या वारंवार येणाऱ्या पुरांमुळे तालुक्यातील ४७ गावे बाधीत झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.शेतकरी बांधवांच्या भात पीक, तूर पीक, सोयाबीन, भाजीपाला आणि कापूस इ. पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या पूरग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे तात्काळ झाली पाहिजेत. अधिकारी वर्गाने देखील दप्तर दिरंगाई करू नये. कोणताही पूरग्रस्त शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाई पासून वंचित राहता कामा नये. याकरिता अधिकाऱ्यांनी सूक्ष्म निरीक्षण करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवावा. असे निर्देश देण्यात आले.

यावेळी तहसीलदार उषा चौधरी सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे, कृषी पर्यवेक्षक इ. अधिकारी उपस्थित होते. पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे काम कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक युद्धपातळीवर करीत असल्याचे तहसीलदार उषा चौधरी यांनी सांगितले. तसेच सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी रवींद्र घुबडे यांनी देखील आढावा सादर केला.

या आढावा बैठकीला भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. कादर शेख, भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, भाजपा शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर, नगरसेवक मनोज वठे, भाजयुमो शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुध्दे, युवा नेते साकेत भानारकर, प्रशांत वसाके पंकज माकोडे, रितेश दाशमवार, भाजयुमो महामंत्री स्वप्निल अलगदेवे, अमित रोकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उमाजी कुथे, माजी पंचायत समिती सदस्य नरेंद्र दुपारे, पवन जयस्वाल, अनिल दोनाडकर, उपसरपंच सदाशिव ठाकरे तसेच भाजपा कार्यालय प्रमुख तथा प्रसिद्धी प्रमुख प्रा. संजय लांबे इ. मान्यवर तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss