Latest Posts

शेतकऱ्यांना किटकनाशक निविष्ठा करीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रातिनिधी / वर्धा (Wardha) : शेतकऱ्यांनी विद्राव्य खते व गोगलगाय किडनियंत्रणासाठी किटकनाशक निविष्ठा करीता महाडीबीटी वर ३० जुन पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे. या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृत्ती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरिप हंगामाकरीता नॅनो युरिय सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस, मेटाल्डीहाइड सोयाबीनच्या (गोगलगाय किडीच्या नियंत्रणासाठी) निविष्ठा पुरविण्यात येणार आहे.

या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर १२ ते ३० जुन २०२४ पर्यंत सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in – farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रमेश देशमुख यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss