Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील विनय जेट्टी या बालकाला उपचाराकरिता केली अर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha): सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र.१० मधील रहिवासी असलेले प्रदीप जेट्टी यांचे कुटूंब मोलमजुरी करून कसेबसे उदरनिर्वाह करत आणि आपल्या परिवारासोबत सिरोंचा येथे राहत आहे.

पण प्रदीप जेट्टी यांच्या कुटूंबातील सर्वांचा लाडका लहान मुलगा विनय प्रदीप जेट्टी वर्ग ८ वा, याला अचानकपणे चार दिवसा अगोदर वात(पॅरालेसीस) झाल्याने जेट्टी कुटूंबावर खूप मोठा संकट आले आणि संपुर्ण कुटूंब चिंतेत होता.

जेट्टी हे कुटूंब मोलमजुरी करून आपले जीवन जगणाऱ्या, मुलाच्या उपचारासाठी आर्थिक समस्या निर्माण झाली, जेट्टी कुटूंबाची आर्थिक समस्या कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत पोहचवली, त्यावेळी राजेंनी आपल्या कार्यकर्त्यांच्या हस्ते १०००/-(दहा हजार रुपये) पाठवून विनय प्रदीप जेट्टी या लहान मुलाला उपचारासाठी जेट्टी कुटूंबाला आर्थिक मदत केली.

त्यावेळी संपूर्ण जेट्टी कुटूंबाने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे आभार मानले. यावेळी राजे साहेबाचे कार्यकर्ते शंकर नरहरी, सीतापती गट्टू, हरीश कोत्तवडला, रमेश मुंगीवार, मुरली मारगोनी व स्थानिक गावकरी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss