Latest Posts

बल्लारपुर : वाहतूक व विपणन विभागाच्या लाकूड आगारात आग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपुर (Ballarpur) : येथील वाहतूक व विपणन विभागाच्या लाकूड आगारात १५ मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आगारातील प्लॉट क्रमांक ५ मध्ये अचानक भीषण आग लागली, आगीचे कारण समजू शकले नसले तरी आगारातील आधिकरी, कर्मचारी व कंत्राटी कामगारांनी तसेच अग्निशमन वाहनाने आग आटोक्यात आणली असली तरी लाखोंचे लाकूड जळून खाक झाले आहे.

बल्लारशाह लाकूड आगार हा वनविभागाचा सर्वात मोठा डेपो आहे. येथून अयोध्या राम मंदिर आणि नवीन संसद भवनाच्या मुख्य दरवाजाच्या बांधकामासाठी सागवान लाकूड पाठवण्यात आले होते. या डेपोमध्ये उच्च दर्जाचे सागवान आणि इतर अनेक प्रकार कोट्यवधींचा माल डेपोत ठेवला आहे. आणि विशेष म्हणजे कोट्यवधींच्या या मालाची सुरक्षा कंत्राटी कामगारांवर सोपवण्यात आली आहे. रविवार व इतर शासकीय सुटीच्या दिवशी व सायंकाळी ६ नंतर वनविभागातील एकही जबाबदार व्यक्ती येथे राहत नाही. कोटय़वधींची वनसंपदा कंत्राटी कामगारांच्या हाती पडली आहे. आज लागलेली आग त्वरीत आटोक्यात आणण्यात आली, अन्यथा कोटय़वधींची मालमत्ता जळून खाक होऊ शकला असता. संबंधित अधिकारी चौकशी करून आगीचे कारण शोधत आहेत.

या परिसरात टवाळखोर मुलं दिवसा व रात्री दारू सिगारेट पितांना दिसतात. या वाहतूक व विपणन विभागाच्या परिसरात सकाळ संध्याकाळ नागरिक फिरायला जातात. महिला, मुली सुद्धा जातात. हे टवाळखोर मुले रस्त्यावर दारूच्या बाटल्या फोडून ठेवतात. आगाराच्या बाजूलाच स्टेडियम मध्ये सुध्दा टवाळखोर मुले रात्रीच्या सुमारास बसून दारू पिताना दिसतात. या परिसरात वन विभाग तसेच पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज आहे.

Latest Posts

Don't Miss