Latest Posts

सामाजिक कार्यासाठी लक्ष्मण येरावार यांना प्रशस्तीपत्र व पुस्तक देऊन सन्मानित  

– उपविभागीय कार्यालय अहेरी तर्फे 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : लगतच्या आलापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण येरावार हे सदैव गोरगरिबांच्या सेवेसाठी धडपडत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन लक्ष्मण येरावार यांना गौरविले.

लक्ष्मण येरावार हे मागील अनेक वर्षांपासून निःस्वार्थ भावनेतून निरंतर व अविश्रांत सामाजिक कार्य करीत असून कार्याची दखल घेऊन गत २६ डिसेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या एका समारंभात लक्ष्मण येरावार यांना गौरवून सन्मान करण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी निरंजन सुधांशू कार्यरत असताना अहेरी येथे जनजागरण मेळावा घेण्यात यावे आणि अहेरी उपविभागातील दुर्गम भागातील जनतेचे रेंगाळलेली व थंडबस्त्यात असलेले कामे शिघ्रगतीने मार्गी लागावे. यासाठी लक्ष्मण येरावार यांची आग्रही भूमिका होती आणि अहेरी येथे प्रथमतः जनजागरण मेळावा घेण्यात आले. मुळात तशी संकल्पना लक्ष्मण येरावार यांची होती, असे दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी निरंजन सुधांशू यांनी अहेरी तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात बोलून दाखविले होते.

लक्ष्मण येरावार हे पत्रकारित्या सोबतच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली निरंतर व अविश्रांत सामाजिक कार्य करीत आहेत. खास करून संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, घरकुल, वनजमिनीचे पट्टे आदी व शासनाच्या अन्य विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाचे व योजनेचे लाभ लाभार्थ्यांना प्राप्त व्हावे, यासाठी ते तळमळीने पुढाकार घेऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असतात.

त्यांच्या कार्याची सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी दखल व कामाची पावती म्हणून प्रशस्ती पत्र व ऐंज अ मॅन थिंक पुस्तक प्रदान करून गौरविले. या बद्दल लक्ष्मण येरावार यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम, उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांचे आभार मानले.

Latest Posts

Don't Miss