Latest Posts

अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ चिमुरात केला रास्ता रोको

– आंदोलकांना केले पोलिसांनी स्थानबध्द

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर पासून सुरू झाला असून. अन्नत्याग आंदोलनासोबत साखळी उपोषण सुरू केले असून थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी चिमूर येथे रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूरचया वतीने विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रविंद्र टोगे यांनी अन्नत्याग उपोषण केले होते. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे आंदोलनातील मागण्या संदर्भात बैठक घेऊन मागण्या मान्य करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० सप्टेंबरला चंद्रपूर येथे येऊन आश्वासन देत उपोष्ण मागे घेण्याची विनंती केली. दोन महिन्याचा कालावधी होऊन सुध्दा आश्वासनाची पूर्तता न झाल्याने चिमूर येथे अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला असून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व ओबीसी युवा कार्यकरते अजित सुकारे यांनी ७ डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले. अन्नत्याग, उपोषणसोबत ८ सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले. तरी सुध्दा शासन दखल घेत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने करण्यात आले.

आज ११ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय चिमूर समोर रास्ता रोखो आंदोलन करून चिमूर- वरोरा राष्ट्रीय महामार्ग बंद केला. चिमूर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र होत असून लवकरात लवकर शासनानी दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

Latest Posts

Don't Miss