Latest Posts

मार्जिन मनी योजनेकरीता प्रस्ताव आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसुचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक स्टॅाडई-२०२०/प्र.क्र.२३ /अजाक, ९ डिसेंबर २०२० अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आलेल्या आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

सदर योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांचे कडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss