Latest Posts

मतदारांच्या सुविधेसाठी उंच निवासी संकुलात मतदान केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. पात्र असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदानाचे आपले कर्तव्य बजावता यावे यादृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. महानगरातील उंच इमारती तसेच अति उंच इमारतीमध्ये असणाऱ्या मतदारांना मतदानाकरिता दूर जावे लागू नये तसेच वास्तव्यास असलेल्या इमारतीमध्ये मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या विहित निर्देशानुसार  नियोजन केले जात आहे.

ज्या निवासी संकुलात / उंच इमारती/ अपार्टमेंटमध्ये २०० पेक्षा जास्त फ्लॅटस आहेत तसेच ९०० च्या वर मतदारांची संख्या असलेल्या ठिकाणी मतदान केंद्र  स्थापन करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर मतदानासाठी मतदाराला जावे लागू नये असा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी सांगितले.

मतदान केंद्र स्थापन करण्यासाठी इच्छुक सदनिकांमधील अध्यक्ष, सचिव किंवा इमारतीमध्ये राहणाऱ्या मतदारांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर ( 7060731408) उपजिल्हा निवडणूक अधिकारी (मो. क्र. ७५८८८१११०५) तसेच निवडणूक कार्यालयाच्या dydeonagpur@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आज सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक घेऊन उपस्थित प्रतिनिधींना ही माहिती देण्यात आली.

Latest Posts

Don't Miss