Latest Posts

अहेरी नगरीत पहिल्यांदाच हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा

– मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रम
– स्नेहा लॉन येथील भव्य पटांगणात २० ऑक्टोबर रोजी आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त अहेरी राजनगरीत पहिल्यांदाच हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

२० ऑक्टोबर हा दिवस म्हणजे राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा जन्मदिवस. दरवर्षी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याही वर्षी विविध सामाजिक कार्यक्रम राबवून रात्रीच्या सुमारास हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

 

सदर कार्यक्रम स्नेहा लॉन येथील भव्य पटांगणात २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास होणार असून या कार्यक्रमाचा अहेरी विधानसभेतील तमाम जनतेने आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss