Latest Posts

पिकाचा रास्त भावासाठी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी आवश्यक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षीप्रमाणे हंगाम २०२४-२५ मध्ये ही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत मका, तुर, चना, मुग, उडिद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाफेड कार्यालयाने गृह आणि सहकार मंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी eSamriddhi पोर्टल सुरू केले असून नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी eSamriddhi पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतमालाला योग्य दर घ्यावा, याकरीता या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे.

तरी सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामार्फत आवाहन करण्यात येते की, दिलेला क्यु-आर कोड स्कॅन करुन अथवा https://esamridhi.in/#/login या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृद्धी पोर्टलवर खरेदी प्रि रजिस्टेशन करावे व केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.

ई-समृध्दी पोर्टलवरील नोंदणीच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी ए.के. बिसने (७३९१९९४६९३) आणि पवन कुंभारे (९८९०८४४३००) यांच्याशी संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss