Latest Posts

वनविभागाने नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करावे : अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू

– माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा तीव्र इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मूलचेरा (Mulchera) : तालुक्यात नरभक्षक वाघामुळे सगळीकडे दहशत माजली असून या वाघाच्या हल्ल्यात दोन महिला ठार झाले. व काही इसम जखमी झाले. असे असतांना सुद्धा संबंधित विभाग काही ही हालचाल करतांना दिसून येत नसून जर संबंधित वनविभागाने त्या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद न केल्यास शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्याचे इशारा आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी दिली आहे.

मूलचेरा तालुक्यातील मथुरानगर व कोडसापूर येथील दोन महिलांवर नरभक्षक वाघाने हल्ला करून ठार केले. त्या नरभक्षक वाघामुळे मूलचेरासह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करने आवश्यक आहे. यासाठी संबंधित वनविभागाने योग्य पाऊले उचलून आज सद्यकाळ पर्यंत वाघाचा बंदोबस्त करणारी टीम जर पोहचले नसेल.

अन्यथा समस्त शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत १७ जानेवारी ला ठिक १० : ३० वाजता DFO कार्यलय समोर तीव्र आंदोलन करण्याची इशारा, माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले आहे.

Latest Posts

Don't Miss