Latest Posts

वनकर्मचारी मारहाण प्रकरणात रेड्डी जाडी मृत्यू प्रकरण : ते कुटूंबिय न्यायाच्या प्रतिक्षेतच

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : सिरोंचा तालुक्यातील सुरय्यापल्ली येथील रेड्डी बुचय्या जाडी हा रात्रीच्या सुमारास जंगलात फिरायला गेला असता गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. सदर मृत्यू वनकर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळेच झाल्याचा आरोप करीत कुटूंबियांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनातून केली होती. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनही या प्रकरणी प्रशासन स्तरावरुन कोणतीही हालचाल न झाल्याने जाडी कुटूंबिय दोन महिन्यांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

रेड्डी बुचय्या जाडी याचा वनकर्मचाऱ्यांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतकाच्या कुटूंबियांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली होती. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांनाही निवेदन सादर केले होते. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनही या प्रकरणी चौकशी थंडबस्त्यात पडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आम्हाला न्याय कोण देणार? असा प्रश्न जाडी कुटूंबीय उपस्थित करीत आहेत.

दोषींवर कारवाई न झाल्यास उपोषण छेडणार : प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र याप्रकरणाची चौकशी मागील दोन महिन्यांपासून थंडबस्त्यात पडले आहे. जाडी कुटूंबीय अद्यापही न्यायासाठी प्रशासनाकडे केविलवाण्या आशेने बघत आहे. येत्या सात दिवसात दोषींवर कारवाई न झाल्यास पीडित कुटूंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणार बसणार – संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते

Latest Posts

Don't Miss