Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत

– भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील नागरिक मुकेश बोगामी यांचा जागीच ठार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील नागरिक मुकेश बोगामी यांचे नातेवाईक गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथील भर्थी असल्याने काल २९ ऑक्टोबर ला मुकेश बोगामी टू व्हीलर पकडून गडचिरोलीला निघाले होते. यांच्या नातेवाईकांना भेट देऊन परत लहरीला येत असतांना चामोर्शी जवळ नियंत्रण सुठून खाली पडून जागीच ठार झाले होते. मूत्यू झालेल्या मुकेश बोगामी यांचा शव गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले. मुकेश बोगमी यांचा शव गडचिरोलीतुन स्वागवी नेण्यासाठी बोगामी कुटुंबियांना अडचण भासत होती.

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी काल भामरागड तालुक्यात दौऱ्यावर असतांना- आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे युवा कार्यकर्ते लक्ष्मीकांत बोगामी यांनी अजय कंकडालवार यांना संपर्क करून विषय सांगण्यात आले. माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी गडचिरोली येथील आपल्या कार्यकर्त्यांना सांगून गाडी उपलब्ध करून देत आर्थिक मदत केले.

अजय कंकडालवार दौऱ्यावर असतांना बोगामी कुटुंबियांना संपर्क करून विचारपूस केले तसेच आपल्याला मयत कार्यक्रम व इतर कार्यक्रमासाठी अडचण भासत असेल तर मला संपर्क करण्यात यावी, म्हणून सांगण्यात आले. त्यावेळी बोगामी परिवारातील सर्व सदस्यांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी शिवराम पुल्लूरी, मिथुन देवगडेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss