Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अंगूवार कुटुंबियांना केली आर्थिक मदत

– माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून नेहमी अडचणीतील कुटुंबियांना मदतीचा हात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील चेरपल्ली येथील नागरिक नागेश अंगूवार यांची पत्नी यशोदा नागेश अंगूवार हिला काही दिवशी पूर्वी ऑपरेशन झाल्याने. हिला आता वर्धा जिल्ह्यात सावंगी येथील त्यांच्या उपचार सुरु आहे. नागेश अंगूवार यांच्या घरची परिस्थिती हलखीची असल्याने त्यांना पुढील औषध उपचारासाठी अडचण बसत होती.

हि अडचण आदिवासी विध्यार्थी संघा- काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना माहिती मिळताच रुग्णांचे पती नागेश अंगूवार यांना अहेरी जनसंपर्क कार्यालय येथील बोलवून त्यांचे अडचण जाणून घेऊन त्यांना पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

त्यावेळी अजय कंकडालवार म्हणाले कि, तुम्हाला तिकडे कोणत्याही अडचण आले तर संपर्क करण्यात यावे म्हणून अंगूवार परिवाराचे प्रमुख नागेश अंगूवार यांना सांगण्यात आली आहे. त्यावेळी त्यांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी मदत करतांना मरपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, विनोद रामटेकेसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अंगूवार परिवाराची नातेवाईक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss