Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी- व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : तालुक्यातील नारानूर व रेंगावाही येथील जय महादाखंडी क्रीडा मंडळ नारानूर- रेंगावाही यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी- व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले असता. सदर या कब्बड्डी- व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पुरस्कार देण्यात येत आहे.

अजय कंकडालवार यांची गावात आगमन होताच नागरिकांनी आदिवासी रेला नूत्य करत ढोल तशाने जंगी स्वागत केली आहे. कंकडालवार यांनी प्रथम सप्तरंगी ध्वजाचा ध्वजारोहन करून आदिवासीचे जंननायक बिरसा मुंडा आणि स्त्री शिक्षणाचे जनणी- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

या स्पर्धेचे उदघाटक आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कब्बड्डी- व्हाॅलीबाॅल स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते व सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी व आविसं तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी होते. सहउदघाटक आविस तालुका सचिव प्रज्वल नागूलवार व ग्रामपंचायत सदस्य रमेश वैरागडे होते.

यावेळी उपस्थित मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, स्वप्नील मडावी, चिंटू आत्रामसह आविसं- काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक- मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss