Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा (Mulchera) : तालुक्यातील मथुरानगर येथील मथुरानगर प्रिमीयार लिंग यांच्या वतीने भव्य रबरी बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.

सदर स्पर्धेचे उदघाटन आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांचे हस्ते करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हनमंतू मडावी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंनरक्षक आलापल्ली होते. प्रमुख अतिथी म्हणून वेलगुर ग्रामपंचायत माजी सरपंच अशोक येलमुले होते.

सदर क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.

उदघाटन प्रसंगी स्वप्नील मडावी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, राकेश रेड्डी, शिपली मंडल ग्रामपंचायत सदशा गोविंदपुर, सावित्री मंडल जी.प. शिक्षिका, जुगला मंडल माजी सरपंच गोविंदपुर, विनोद मंडल, अनंत शाणा, देवेन सरकार, बिशू देबनाठ, मंडल, दुलाल मंडल, मारोती मडावी माजी सरपंच अवलमरी, अक्षय मडावी, मारोती ओडेवरसह आविसं- काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक- मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss