Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : तालुक्यातील येमली येथे जय पहादी पारी कुपार लिंगो क्रीडा मंडळ येमाली यांचे सौजन्याने भव्य ग्रामीण पुरुष- महिला कब्बड्डी व व्हॉलीबॉल सामने आयोजन आले आहे. या कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा आहेती बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनुमंतू मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून आविसंचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदु मट्टामी – भामरागड आविसं तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा होते.

सदर हा पुरुष- कब्बड्डी अ गट स्पर्धेसाठी माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. तर द्वितीय पारितोषिक अजय गावडे पोलीस पाटील उडेरा- प्रज्वल नागुलवार सचिव आविस तथा भारतीय काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष- महेश बिरमवार- सिनू बिरमवार- संतोष बिरमवार यांच्या कडून देण्यात येत आहे. महिला कबड्डी (अमर्यादित) प्रथम पारितोषिक गोनाळे ग्रामसेवक येमली- जि.प. शाळा येमली यांच्याकडून देण्यात येत आहे. तसेच द्वितीय पारितोषिक नंदु मट्टामी आविसं अध्यक्ष तथा महा. ग्रामसभा अध्यक्ष तालुका एटापल्ली- नानेश गावडे सचिव आ.वि.का.स. तोडसा याच्याकडून देण्यात येत आहे.

तसेच व्हॉलीबॉल सामन्याचे प्रथम पुरस्कार अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सोनाली कंकडालवार- मीना नागुलवार नगरपंचायत उपाध्यक्ष एटापल्ली, संगीता दुर्वा माजी प.स. सदस्य एटापल्ली, मुन्नी दुर्वा माजी सरपंच ग्रा.प. उडेरा यांचेकडून तसेच द्वितीय पारितोषिक किशोर पदा आ.वि.का.स. संस्था हेडरी, रमेश वैरागडे सदस्य ग्रा.प. गेदा, बाजीराव हिचामी संचालक आ.वि.स.का. उडेरा, रामा तुमरेटी माजी सरपंच यांच्याकडून देण्यात येत आहे.

यावेळी प्रज्वल नागुलवार सचिव आविस तथा भारतीय कॉग्रेस कार्यकारी अध्यक्ष, सुधाकर गोटा तोडसा इलकापट्टी अध्यक्ष, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, डोलेश मडावी, इरपा मडावी, मंगेश हलामी, महेश बिरमवार, उमेश मडावी ग्रा.प. सदस्य येमली, शंकर सडमेक, अनिल करमरकर संचालक कृ.उ.बा.स. अहेरी, रमेश वैरागडे सदस्य ग्रा.प. गेदा, सतू गावडे सदस्य ग्रा.प. गुरुपल्ली, जगपत गावडे, झाडे मुख्यद्यापक विवेकानंदशाळा, जीवन तलांडे, तिगरू पुंगटी, खामनकर, सुरेश मटामी, नामदेव हीचामी नगरसेवक न.प. एटापल्ली, बाजीराव हीचामी संचालक आ.वि.का.स. उडेरा, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, नरेश गर्गाम, सचिन पंचार्या, प्रमोद गोडसेलवार सह आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक- मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss