Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील नवेगाव येथील फ्रेंड्स क्लब नवेगाव तर्फे टेनिस बॅल क्रिकेट सामने आयोजितकरण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सहउदघाटक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेलगुर ग्रामपंचायतचे सरपंच किशोर आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून आंबटपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच उमेश कोडते आणि गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य बंटी शेंडे उपस्थित होते.

सदर क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक वेलगुर ग्रामपंचायतचे सरपंच किशोर आत्राम यांच्याकडून तर तृतीय पारितोषिक आंबटपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच उमेश कोडते आणि गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य बंटी शेंडे यांच्याकडून देण्यात येत आहे.

यावेळी अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर, किशोर आत्राम सरपंच वेलगुर, गीता चालुरकर माजी उ.प. सभापती पंचायत समिती अहेरी, सुधाकर तिम्मा अध्यक्ष भामरागड, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपली, स्वप्नील मडावी सां.का., प्रभाकर शेंडे पोलिस पाटील, उमेश पेगरकर, शुभम शेंडे, मंडल, उमेश कडते, रोहित गलंबले ग्रा.प. सदस्य, दुर्गे, हरीशचद्रा कोटारंगे, प्रवीण कोटरंगे, चंदू बोरूले, गजानन मोहूर्ले, भगवान गुरनूले, मोतीराम मोहुर्लेसह आदी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss