Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा (Mulchera) : तालुक्यातील कोडीगांव टोला येथील राजे शिव छत्रपती महाराज क्रिडा मंडळ कोडीगांव टोला यांच्या वतीने खुले कब्बड्डी स्पर्धेची आयोजित केली आहे. या कब्बड्डी स्पर्धेची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते. अध्यक्ष म्हणून अंबाटपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच उमेश कडते उपाध्यक्ष म्हणून गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य शुभम शेंडे होते.

सदर या कब्बड्डी स्पर्धेसाठी तीन पुरस्कार ठेवण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी, सरपंच उमेश कडते, ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे यांच्याकडून तर तृतीय पारितोषिक रघुनाथ मडावी यांच्याकडून देण्यात येत आहे.

यावेळी उदघाटन प्रसंगी परिसरातील आविसं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक, मंडळचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss